मानसिक आजार आयुर्वेदाच्या चष्म्यातून
बऱ्याच वेळा घरामध्ये लहान मुली बायको, आई, आजीची छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचीड , संताप , भिती , राग व्यक्त होत असतो. व त्यामुळे घरातले वातावरण आनंददायी राहण्याऐवजी तणावपुर्ण होते. आपण याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. पण हे असे का होते ? याचा विचार करणे गरजेचे आहे , अशा स्वरूपाची लक्षणे फ़क़्त मानसिक नसून ती शारिरीक आजाराची सुद्धा असु शकतात याचा विचार आपण करायला हवा.
1.लहान मुलींमध्ये साधारणत: कृमी किंवा जंत असतील तर ती चिडचिड करताना ,हट्टि होताना दिसतात.
- मुलगी वयात आल्यावर जर तीची पाळी व्यवस्थित येत नसेल तर किंवा हार्मोनल बदलांमुळे संतापी ,घाबरलेली ,अशी लक्षणे दिसतात.
- मध्यम वयामध्ये थायरॉइड, डोकेदुखी, पाळीच्या तक्रारी,सांध्यांचे आजार,सौंदर्य विषयक समस्यां यामध्ये चिडचिडपन अनुभवायला मिळते.
4.स्त्रीयांमध्ये मोनोपॉज च्या काळात मुड स्विंग्स होतात. - शरीरातील वात वाढत असल्यास स्वभावात क़ोरडेपणा , पित्त वाढल्याने रागीटपणा व कफ वाढल्याने मंदपणा ,सुस्ती आळस , फ़्रेश न वाटणे ,उत्साह हानी ही लक्षणे दिसतात.
- शरीरातील रस धातूचे पोषण व्यवस्थित होत नसेल तर स्वभावांत रूक्षपणा,थकवा व चिडचिड जाणवते. रक्त कमी असल्यास फ़्रेश न वाटणे ,उत्साह हानी , अशक्तपणा जाणवतो
- ज्या लोकांचे कम्प्युटर वर सतत काम असते त्यांच्या शरीरातील मज्जाधातूचे किंवा मेंदूचे जास्त काम आहे. त्या लोकांमध्ये कालांतराने मज्जेचा क्षय होऊन कोरडेपणा चिडचिडपना येतो.
उपचार :
आहाराचे – उत्तम नियोजन , २ वेळ भाजी चपाती डाळ भात चमचाभर देशी गाईचे तुप
व्यायाम व योगाच्या साहायाने मन व शरीर संतुलन होते,
आजारांच्या समूळ नाशासाठी आयुर्वेदिक औषधी व पंचकर्म ,ह्रदय बस्ति, मन्याबस्ति, कटीबस्ति तसेच शरीरातील स्नेह वाढविला तर स्वभावातीलही स्नेह वाढतो. जसे, शिरोधारा, नेत्रतर्पण, नस्य ,कर्णपुरण, वैगरे उपचाराच्या साहाय्याने चिडचिडेपणावर , भिती , राग , संताप , निरुत्साह , आळस ,सुस्तपणा यावर मात करता येते.
डॉ. सारीका लोंढे
एम.डी आयुर्वेद
स्त्री रोग तज्ञ