1) केसांना तेल लागण्याची योग्य पद्धत ही रोज केसांना मुळांना थोडे-थोडे तेल लावणे ही होय न की आठवड्यातून एकदा भरपूर तेल लावणे
2 ) केस जेवढी मोकळी सोडली जातात तेवढा डँड्रफ जास्त होतो
3) केस धुण्यासाठी शाम्पू किंवा काही केमिकल्स वापरण्यापेक्षा शिकेकाई नी केस धुतल्यास गळण्याचे प्रमाण कमी होते व शाम्पूमुळे लागणारे अतिरिक्त पाणी याचाही वापर कमी होतो व गरजेपुरते तेल केसांच्या मुळाला पोषण करत राहते
4 ) केसांना काळे करण्यासाठी डाय लावणे हे दारूचे व्यसनासारखे आहे जेवढी डाय लाऊ तेवढी केस पांढरी होत जातात यावर योग्य उपाय म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केस पांढरे होऊ नये म्हणून उपचार घेणे किंवा पांढरे झालेले केस काळे होण्यासाठी उपचार घेणे
5) केसांच्या आयर्निंग करणे म्हणजे जसे एखादा रुग्ण भाजते व त्या भाजलेल्या जखमा भरून येण्यासाठी भरपूर प्रोटिन्स द्यावे लागते त्याप्रमाणे केसांना आयर्निंग करणाऱ्या व्यक्तींना त्या केसांना तेवढ्या प्रमाणात प्रोटिन्स द्यावे लागते अन्यथा भाजलेल्या जखमांस सारखे ते केस निर्जीव होतात व मधूनच तुटायला लागतात शक्यतो आयर्निंग टाळावे.
6) आपल्या केसांची प्रकृती काय आहे यानुसार त्यांना तेल किती लागणार आहे हे ठरते उदाहरणार्थ वातप्रकृतीच्या मनुष्याचे केस हे कुरुळे कोरडे असतात त्यांना भरपूर प्रमाणात तेल लागते तसेच कफ प्रकृतीच्या रुग्णांचे केस स्निग्ध असतात तेलकट असतात त्यांना कमी प्रमाणात तेल लागते अशा पद्धतीने आपल्या केसांची प्रकृती जाणून त्याची काळजी घेता येते
7 ) केसांचे आरोग्य टिकवण्यासाठी संतुलित आहाराची संतुलित व्यायामाची व संतुलित झोपेची गरज जास्त आहे
8) केसांचे विकार होण्याची कारणं शारीरिक आहेत का हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे उदाहरणार्थ शरीरामध्ये रक्त कमी असणे ,पाळी व्यवस्थित न येणे, थायरॉईड सारखे आजार असणे , हाडांची झीज होणे ,मेंदूचे पोषण न होणे अशा कारणाने सुद्धा केस गळतात , मानसिक कारणांमध्ये अति काळजी , राग ,भीती ,द्वेष, संताप ,चिडचिड या गोष्टींनी सुद्धा केस गळतात फक्त तेल लावून किंवा बाहेरून काहीतरी उपाय करून केस गळणे थांबत नाही तर त्यासाठी आतूनही उपचार होणे गरजेचे आहे .
9 ) लहान मुलांमध्ये केस पांढरे होण्याचे कारण वेफर्स , नमकीन , मीठ ,पॅकबंद फुड हे आहेत ते टाळणे गरजेचे आहे आहे
10) तसेच सौंदर्यवर्धनासाठी वापरल्या गेलेल्या हाय हिल्स सैंडल मुळे मणक्या मध्ये गॅप पडणे किंवा मणक्याचे आजार होणे निर्माण होतात
11 ) सकाळी उठल्यावर चूळ भरणे , घरामध्ये कुंडीमध्ये चार-पाच कडुनिंबाचे रोपे लावून त्या कडुनिंबाच्या कष्टाने दात घासणे , आंघोळीच्या वेळेस साबण न वापरता उटणे लावणे ,
तसेच शरीरावरील अनावश्यक केस घालवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी दगडाच्या साबणाने अंग घासणे अशा छोट्या छोट्या गोष्टी द्वारे शारीरिक सौंदर्य वाढवता येते.